सोलापूर जिल्हा ग्रामीण मंगळवारी 138 रुग्ण वाढले, 258 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) मंगळवार 6 आँक्टोबर रोजी एकूण 138 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 42 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 258 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 5 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26674 इतकी झाली असून यापैकी 20938 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 5006 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 258 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 730 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 5 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 42 रूग्ण वाढले
पंढरपूर -मंगळवारी 5 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 12 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 30 असे 42 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 201 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 128 झाली आहे.एकूण 689 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4384 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .