सोलापूर शहरात 28 नवे रुग्ण वाढले तर 93 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर – सोलापूर शहरात 12 आँक्टोंबर अहवालानुसार 28 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर आज 93 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
428 चाचणी अहवाल प्राप्त असून पैकी 400 निगेटिव्ह आहेत. 28 जण पाँझिटिव्ह आहेत. आजच्या अहवालानुसार 1 जण मयत आहे. सोलापूर शहरात आजवर 9072 रुग्ण आढळले असून 7706 जण बरे होवून घरी गेले आहेत. 503 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. 863 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.