स्वेरीच्या ‘क्यू.एम.एस. इन फार्मासुटिकल्स’ विषयावरील वेबिनारला मोठा प्रतिसाद
पंढरपूर -कोरोना महामारीमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बी. फार्मसी महाविद्यालयातील ‘इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल’ कडून विद्यार्थ्यांसाठी वेबिनार आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये ‘क्यू. एम. एस. इन फार्मासुटिकल्स’ या विषयावर गोव्यातील युनिकेम लॅबोरेटरीजचे एक्झिक्यूटिव्ह जयप्रकाश नोगजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच “करंट इंडियन फार्मासिटिकल रेग्यूलेशन्स पोस्ट कोविड -19 अपॉर्च्युनिटी” या विषयावर गुजरात सरकारचे माजी औषध निरीक्षक उपायुक्त डॉ. मयूर परमार यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. परमार यांनी फार्मसी मधील विविध रेग्यूलेशन्स बद्दल सविस्तर माहिती दिली. यासोबत त्यांनी कोरोना महामारीनंतर फार्मसी क्षेत्रातील संधी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य डॉ.अमित गंगवाल यांच्या नेतृत्वाखाली प्रा. प्रदीप जाधव आणि प्रा. विजय चाकोते यांच्या सहकार्याने हे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.