स्वेरीच्या डिप्लोमाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ,२०३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण

पंढरपूर– महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या पॉलिटेक्निकच्या २०२० च्या उन्हाळी परीक्षेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) कॉलेजच्या एकूण २०३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले तर ८० टक्के ते ९० टक्के दरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या ३५३ एवढी आहे तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेली सलग तिन वर्षे शंभर टक्के प्रवेश पूर्ण झालेले महाराष्ट्रामधील स्वेरी हे बहुधा एकमेव खाजगी कॉलेज असून उज्ज्वल निकालामुळे स्वेरीचा नावलौकिक महाराष्ट्रभर झाला आहे.
यामध्ये प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल शाखेमधून प्रथम क्रमांक श्रावणी खर्डे (९९.२५ %), द्वितीय-साक्षी कारळे (९८.३८ %), तृतीय- गायत्री गोरे (९८.२५ %), कॉम्प्यूटर शाखेमधून प्रथम क्रमांक आहिल्या कोकरे (९७.२५ %), द्वितीय निलेश काशीद (९६.८८ %), तृतीय सौरभ साळुंखे (९६.३८ %), सिव्हिल शाखेमधून प्रथम क्रमांक तुळशीदास लोंढे, अस्मिता मोरे व हर्षाली बाबर (९७.९० %), द्वितीय आकांक्षा झाडे (९६.४३ %) तर तृतीय स्वरदा खिस्ते (९४.२१ %), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेमधून प्रथम क्रमांक प्रिया घाडगे, ऋतुजा जाधव, आकांक्षा माळी (तिघींनाही ९६.१३ %), द्वितीय रेणुका पवार (९५.३८ %), तृतीय वैष्णवी नेटके (९५.२५ %), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेमधून प्रथम क्रमांक गायत्री गोरे (९८.२५ %), द्वितीय-सुरय्या पठाण (९६.६३ %), तृतीय-वैष्णवी टोणगे (९५.५० %), तर मेकॅनिकल शाखेमधून प्रथम- प्रसाद डोंबे (९८.१३ %), द्वितीय-कोमल पाटील, निकिता यादव, श्रद्धा सरवळे (तिघींनाही ९७.०७ %), तृतीय-अथर्व दोशी (९६.६७ %) अशाप्रकारे गुण मिळवून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तसेच द्वितीय वर्ष सर्व विभागातून प्रथम- गीतांजली चव्हाण (९८.००% ), द्वितीय- केशव सरडे (९७.८८%) तर तृतीय-सागर विशाल याने (९७.८७ %) गुण मिळविले. प्रथम व द्वितीय वर्षामधून वेगवेगळ्या विषयांमध्ये ९७ व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२८ आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, तसेच संस्थेअंतर्गत असणाऱ्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!