स्वेरीच्या वतीने साडेसात लाखाचा सहाय्यता निधी
पंढरपूर – कोरोना विरोधातील लढ्यास हातभार लावण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. यास प्रतिसाद म्हणून गोपाळपूर येथील विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात स्वेरी अंतर्गत चार महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी मिळून पी.एम.केअर्स फंडाला तीन लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी साडेचार लाख रूपयांची मदत देवू केली आहे.
वेळोवेळी समाजासाठी आवश्यक असणार्या अनेक उपक्रमांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विश्वस्त नेहमीच भरीव योगदान देत असतात. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूशी मुकाबला करण्यासाठी हा साडेसात लाखाचा मदत निधी संस्थेने उभा केला आहे. केरळ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी व कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी अशाच पद्धतीने स्वेरीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरीव मदत केली होती.