स्वेरी फार्मसीला मिळाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए. मानांकन

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) पंढरपुरला ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन)च्या निकषांशी संलग्नित असणारे एन.बी.ए. मानांकन प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

स्वेरी संचलित बी फार्मसीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए. मानांकन मिळाल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे देताना या यशाचे श्रेय सर्व आजी-माजी विद्यार्थीपालकशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वेरी संस्थेचे विश्वस्त मंडळ व महाविद्यालयाचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स यांना दिले. पुढे त्यांनी  एन.बी.ए. मानांकनाचे फायदे व महाविद्यालयाच्या विविध घटकांना या मानंकनापासून मिळणार्‍या फायद्याबद्धल माहिती दिली. एन.बी.ए. ही शैक्षणिक संस्थांना मानांकन देणारी देशातील स्वायत्त संस्था असून १९८९ मध्ये वॉशिंग्टनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराराची सदस्य आहे. म्हणून हे मानांकन मिळालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे या सदस्य देशातील मानांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या तोडीचे संबोधले जातील.

या करारामध्ये सामील असणारे देश ऑस्ट्रेलिया,  कॅनडातैवान, हाँगकाँग, भारत, आयर्लंड, जपान,  कोरिया,  मलेशिया, न्यूझीलंडरशियासिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंकातुर्कीयुनायटेड  किंगडम आणि युनायटेड स्टेटस् हे आहेत.

या मानांकनामुळे महाविद्यालयाला उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्याने, फार्मसी महाविद्यालयात विविध संशोधन निधी मिळण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रशिक्षणाचे सर्वोच्च मानांकन एन.बी.ए मिळविणे सोपे नाही. हे मानांकन अर्ज भरण्याकरीता सुद्धा बरीच महाविद्यालये पात्र नाहीत एन.बी.ए. साठी अर्ज करण्यासाठी अगोदर तुम्हाला पात्रता फेरीत उत्तीर्ण व्हावे लागते. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार पुढील काही शैक्षणिक वर्षामध्ये अशी मानांकने नसणार्‍या  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती तसेच इतर सवलती मिळण्यास अडचणी निर्माण होवू शकतात.हे मानांकन मिळण्याकरिता स्वेरी बी.फार्मसी महाविद्यालयाने प्रमाणित पद्धतीचे सर्व पूरक कागदपत्रे सादर केल्यावर व त्यातील प्राथमिक निकषांवर महाविद्यालयाची गुणवत्ता सिद्ध झाल्यानंतर एन.बी.ए.कडून ३ तज्ज्ञांच्या समितीने महाविद्यालयात १० व ११ ऑगस्ट २०१९ दरम्यान भेट देवून सादर केलेल्या माहितीची शहानिशा व वस्तुस्थिती पाहून तज्ञ समितीने आपला अहवाल एन.बी.ए.कडे पाठविला. समितीने या महाविद्यालयाच्या विविध निकषांवर तपासणी केली असता मुख्यत्वे महाविद्यालयाची शैक्षणिक उद्दीष्टे, अभ्यासक्रमाचा दर्जा वत्याची अंमलबजावणी,  विद्यार्थ्यांचीगुणवत्ता,  शिक्षकांची गुणवत्ताशैक्षणिक व पायाभूत सुविधाकॅम्पस प्लेसमेंट तसेच आतापर्यंत महाविद्यालयाने केलेल्या उत्कृष्ठ प्रगतीची दखल घेतली.

       पंढरपूर पंचक्रोशीतील पालकांच्या मागणीनुसार २००६ साली बी. फार्मसीची स्थापना झाली. तेव्हापासून प्रत्त्येक वर्षीचा निकाल हा अव्वल असतो. पहिल्याच प्रयत्नात बी. फार्मसीला एन.बी.ए. मानांकन प्राप्त झाले असून हे मानांकन तीन वर्षासाठी मिळाले आहे. आपले शैक्षणिक उद्दीष्टे पूर्ण करीत संस्थेचा विकास साधण्याच्या भूमिकेतून संस्थेने नेहमीच प्रमाणित करणाऱ्या विविध संस्थाकडून मानांकने मिळवून वेळोवेळी आपला दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता सिध्द केली आहे. एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे फार्मसी व अभियांत्रिकीच्या सर्व अधिष्ठातांचे,  विभागप्रमुखांचे,  शिक्षकांचे,  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे व अन्य सर्व विश्वस्थांनीआजी माजी विद्यार्थ्यांनी व पालकांनी कौतुक केले. कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चरकल्चरकॅम्पस प्लेसमेंटअल्पावधीत निर्माण झालेले संशोधनाचे वातावरण आणि विद्यापिठात सर्वोच्चस्थानी असलेले शैक्षणिक निकाल आणि यांच्या पंक्तीला आता एन.बी.ए. मानांकन आल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक वर्गात देखील समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांचा सत्कार स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, डॉ. प्रशांत पवार, प्रा. रामदास नाईकनवरे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर उपस्थित होते.  संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त तसेच इतर तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

 

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!