37 वर्षानंतर पंढरीत डीव्हीपीच्या पुढाकाराने फुटबॉल स्पर्धा, क्रीडाप्रेमींमध्ये  उत्साहाचे वातावरण

पंढरपूर – क्रिकेटप्रेमी भाग असणार्‍या पंढरपूर परिसरात फुटबॉलच्या स्पर्धा 1983 मध्ये झाल्या होत्या. यानंतर आता जवळपास 37 वर्षानंतर डीव्हीपी उद्योग समुहाने हा योग जुळवून आणला असून येथील रेल्वे मैदानावर शुक्रवारी सकाळी फुटबॉल स्पर्धांना सुरूवात झाली.

डीव्हीपी चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अरुण पवार व तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर असते मात्र त्यांना यथायोग्य संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. हा मूळ हेतू केंद्रस्थानी ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात प्रसिद्ध असलेल्या पारंपरिक क्रिकेट व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, हा देखील यामागील हेतू आहे. जितके जास्त क्रीडाप्रकार प्रसिद्ध होतील तितक्या अधिक संधी उपलब्ध करून देता येतील अशी व्यापक भूमिका ही स्पर्धा भरविण्यामागे आहे.

यापूर्वी 1983 मध्ये पंढरपूर येथे अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर आजच अशी स्पर्धा होत आहे. त्यामुळे पंढरपूर येथील क्रीडाप्रेमी नागरिक आणि युवक अत्यंत आनंदित झाले आहेत. तीर्थक्षेत्र असणारे हे शहर क्रिडेची ही पंढरी व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी साईनाथभाऊ अभंगराव, महादेव धोत्रे, संजय ननवरे, विशाल मर्दा , पांडुरंग बोडके, भालचंद्र देवधर ,डॉ.आरिफ बोहरी, विक्रमसिंग भोसले, अर्जुन पवार, फुटबॉल प्रशिक्षक किरण जाधव, सुधीर अभंगराव, युवराज मुचलंबे, ओंकार जोशी,ओंकार वाळूजकर, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य संजय अभ्यंकर, विठाई फुटबॉल क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!