भीमा खोर्यात 66 टक्के उपयुक्त पाणीसाठा, अनेक प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर
पंढरपूर – अद्यापही भीमा खोर्यात पावसाची हजेरी अनेक प्रकल्पांवर लागत असून येथील वीस धरणांमध्ये सरासरी 66 टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. महत्वाची धरणं क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. उजनी 37.08 टक्के भरले आहे. तर नीरा खोर्यातील चार धरणात 85 टक्के पाणी साठा झाला आहे.
मागील चोवीस तासात टेमघर धरणावर 90 मि.मी., यासह मुळशी 58, वरसगाव 38, पानशेत 39, खडकवासला 12, वडीवळे 45, पवना 23, आंध्रा 22 ,डिंभे 28 मि.मी. तर नीरा खोर्यात गुंजवणी 4, देवघर 40 व भाटघर प्रकल्पावर 17 मि.मी. पावसाची नोंद आहे.
उजनी धरणात येणारी पाण्याची आवक 15 हजार 597 क्युसेक इतकी आहे तर पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा कमी होवून 13 हजार 830 क्युसेक इतका झाला आहे. भीमा खोर्यातील अनेक प्रकल्प आता क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. येथे उपयुक्त पाणीसाठा हा 66 टक्के झाला असून घोड उपखोर्यातील धरणं ही हळूहळू भरत आहेत. नीरा खोर्यातील गुंजवणी, देवघर, भाटघर व वीरमध्ये 85 टक्के पाणीसाठा झाला आहे.
दरम्यान उजनी धरणात 83.52 टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून यात उपयुक्त पाणी हे 19.86 टीएमसी इतके आहे. मागील काही दिवसांच्या पावसाने ते जलाशयात साठले. या काळात उजनीवर पावसाचा पत्ता नाही. येथे एकूण 247 मि.मी. पर्जन्यमान या पावसाळ्यात नोंदले गेले आहे.
दि 27/07/2021
सध्या वीर धरणामधून नीरा नदीमध्ये 800 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करून पहाटे 4.30 वाजता 4509 Cusecs विसर्ग करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.असा इशारा देण्यात आला आहे.