सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरूवारी 152 कोरोना रुग्ण वाढले, एकूण संख्या 31727
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरुवार 5 नोव्हेंबर रोजी एकूण 152 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 49 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 141 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 6 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31727 इतकी झाली असून यापैकी 28997 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1789 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 141 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 941 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 6 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 49 रूग्ण वाढले
पंढरपूर- गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 9 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 40 असे 49 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 341 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण मयत आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 190 झाली आहे. सध्या एकूण 503 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5648 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .