शुक्रवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 145 रुग्ण वाढले, एकूण संख्या 32966
– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवार 13 नोव्हेंबर रोजी एकूण 145 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 42 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 146 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 3 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजारावऱ मात करून घरी परतणार्यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 32966 इतकी झाली असून यापैकी 30101 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1888 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 146 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 977 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 3 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 42 रूग्ण वाढले
पंढरपूर– शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 19 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 23 असे 42 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 608 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 200 झाली आहे. सध्या एकूण 522 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5886 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .