25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मुखदर्शन बंद
पंढरपूर– कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा प्रतीकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरी होत असून 25 व 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर व लगतच्या गावांमध्ये संचारबंदी असणार असल्याने 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान श्री विठ्ठल रखुमाईचे सध्या सुरु असलेले मुखदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिरे समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकाव्दारे माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान भाविकांकडून होणारी मागणी विचारात घेता 23 व 24 नोव्हेंबरला मुखदर्शन सुरु असणार आहे. (यासाठी आँनलाईन दर्शन पास बुकिंग आज 22 नोव्हेंबरपासून पासून सुरु आहे.) रोज 2 हजार भाविकांना ते घेता येईल. यासाठी बुकिंग आवश्यक आहे. 25 ते 27 नोव्हेंबर श्रींचे मुखदर्शन बंद असणार आहे तर 28 पासून पुढे आँनलाईन बुकिंग दर्शनाबाबतचे वेळापत्रक मंदिर समिती जाहीर करणार आहे. अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.