पंढरपूर – तालुक्यातील खर्डी येथील श्री सद्गुरु सीताराम महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आणि वार्षिक यात्रा यंदा कोरोनाच्या सावटामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांनी 12 ते 14 डिंसेबर दरम्यान खर्डीत येऊ नये. या काळात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खर्डीत ग्रामस्थांकडून जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्यांची माहिती खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांनी दिली आहे.
यावेळी सरपंच रमेश हाके , सदगुरु श्री सीताराम महाराज ट्रस्टचे अध्यक्ष दीपक रामचंद्र रोंगे व ग्रामस्थ उपस्थित होते . सद्गुरु सीताराम महाराज देवस्थान हे पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्हयातील एक जागृत देवस्थान आहे. श्री सद्गुरु सीताराम महाराज यांची 13 डिंसेबर रोजी पुण्यतिथी आहे. प्रतिवर्षी खर्डीत मोठा उत्सव आणि यात्रा भारत असते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सदरचा उत्सव साधेपणाने मंदिरात केवळ विधिवत पूजाअर्चा आणि नित्योपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात इतर भक्तांना कुठल्याही प्रकारे दर्शन मिळणार नाही. तथापि मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी सीताराम महाराजांच्या भक्तांनी 12 डिंसेबर ते 14 डिंसेबर पर्यत खर्डी येथे येवू नये. असे आवाहन ग्रामस्थ तसेच श देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे , खर्डीतील उत्सवा दरम्यान खर्डी ग्रामस्थांनी देखील मंदिर परिसरात गर्दी करू नये. यासाठी तीन दिवसाच्या काळात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.