पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महानगर पालिकाक्षेत्र वगळून )आजवर 39 हजार 143 कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी 8013 एकट्या पंढरपूर तालुक्यात आढळून आले होते. यापैकी 7675 जणांनी उपचारानंतर या आजारावर मात केली असून सध्या केवळ 101 रूग्ण उपचार घेत आहेत. दुर्दैवाने या आजारात 237 जणांनी प्राण गमावले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजाराच्या पुढे गेली आहे. मंगळवार 19 जानेवारी रोजी शहरात 2 तर ग्रामीण भागात 8 जणांची नव्याने यात भर पडली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होत असून रिकव्हरी रेट ही जास्त आहे. जिल्ह्यात केवळ 466 जण विविध तालुक्यात या आजारावर उपचार घेत आहेत. सर्वाधिक रूग्ण 101 पंढरपूर तालुक्यात आहेत. या आजाराने सर्वाधिक मृत्यू पंढरपूर तालुक्यात 237 इतके नोंदले गेले आहेत.
पंढरपूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ग्रामीणपेक्षा कमी असून येथे आजवर 3359 रूग्ण आढळून आले होते. यापैकी 97 जणांचा मृत्यू झाला असून 3224 जण उपचारानंतर बरे झाले तर सध्या केवळ 38 जणांवर उपचार सुरू आहेत. पंढरपूरच्या ग्रामीण भागात 4654 रूग्ण आढळून आले असून यापैकी 140 जणांनी प्राण गमावले तर 4451 जण बरे झाले आहेत. सध्या 63 जण उपचार घेत आहेत.