पंढरपूरच्या कलापिनी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सोलापूर आकाशवाणीवर तबला वादन
पंढरपूर – येथील कलापिनी संगीत विद्यालयाच्या पंढरपूर शाखेतील 6 विद्यार्थ्यांची सोलापूर आकाशवाणी केंद्रावरील प्रसारितत होणाऱ्या बालसभा या कार्यक्रमात तबला वादन झाले आहे, अशी माहिती कलापिनी संगीत विद्यालयचे संस्थापक व प्राचार्य पं.दादासाहेब पाटील यांनी दिली आहे.
यामध्ये देवेश दिनेश खरे, शिवराज दत्तात्रय भूजबळ, वरद सुधीर मेढेकर, कृष्णा नंदकुमार भोसले, शुभम महेश मेलगे, शरद नवनाथ पोरे अशी तबला वादन सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. गेल्या 42 वर्षापासून पंढरपूर येथे कलापिनी संगीत विद्यालयाचे कार्य चालू आहे.
भारतीय संगीत विषयाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या विद्यालयाचे कार्य खूप मोठे असून शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना यामुळे शास्त्रशुद्ध व दर्जेदार संगीत शिक्षण मिळत आहे.
निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तबला वादक व आदर्श संगीत शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले. आकाशवाणी केंद्रावर तबला वादनाची संधी मिळाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त केले.