विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याची निवडणूक सलग सहाव्यांदा बिनविरोध
पंढरपूर – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची २०२१ ते २६ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून आमदार बबनराव शिंदे गटाने दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी २१ ही अर्ज पात्र ठरले आहेत. विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीला मिळवित पुन्हा एकदा आमदार शिंदे यांच्या यशस्वी राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
१ फेब्रुवारी रोजी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची २०२१ ते २०२६ साठी संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली होती. यानंतर शिंदे विरोधकांनी चाचपणी केली मात्र काहीही साध्य झाले नाही. विरोधकांना उमेदवारही न मिळाल्यामुळे त्यांना सपशेल माघार घ्यावी लागली.
१९९५ ते २०२१ पर्यंतच्या सलग पंचवीस वर्षात कारखान्याच्या निवडणुकीत सहावेळा आमदार शिंदे यांच्या संचालक मंडळाने बिनविरोध परंपरा कायम ठेवली.
बिनविरोध उमेदवार
बबनराव विठ्ठलराव शिंदे, रमेश व्यंकटराव येवले-पाटील, वामनराव उबाळे, सुरेश मारूती बागल, पोपट दिगंबर गायकवाड, अमोल सौदागर चव्हाण, निळकंठ भगवान पाटील, शिवाजी महादेव डोके, लक्ष्मण रामदास खुपसे, विष्णू महादेव हुंबे, प्रभाकर गंगाधर कुटे, भाऊराव भानुदास तरंगे, रणजितसिंह बबनराव शिंदे, लाला मारूती मोरे, वेताळ जालिंदर जाधव, सचिन कल्याण देशमुख, विक्रमसिंह बबनराव शिंदे, पांडुरंग देवराव घाडगे, पोपट बलभीम चव्हाण, सिंधुताई सुभाष नागटिळक, संदीप भुजंगराव पाटील.