इस्कॉनचे भारतातील संचालक कृपावंत व्रजेंद्रनंदन दास यांनी घेतली मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच इस्कॉनचे भारताचे प्रमुख संचालक कृपावंत व्रजेंद्र नंदन दास यांनी मुंबई येथे कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन त्यांना भगवद गीता भेट दिली . यावेळी हिंदुत्ववादासह विविध मुद्द्यांवर ठाकरे यांच्याशी दास यांनी चर्चा केली. ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी देखील त्यांनी यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच इस्कॉनच्या संत, महंत यांनी त्यांची भेट घेत त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. यामध्ये देशातील वेगवेगळ्या प्रांतातील हिंदुत्ववादी कार्यक्रमांना येत असणाऱ्या अडचणी तसेच त्या संदर्भातील निराकरण करण्यासाठी योग्य ती भूमिका घेण्याची गरज, याबाबत राज ठाकरे यांनी इस्कॉनच्या पाठीमागे राहून हिंदुत्ववादी लढ्याचे नेतृत्व करावे. अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली.
तसेच एकीकडे अयोध्येमध्ये श्रीरामचंद्रांचे भव्यदिव्य मंदिर उभा राहत असताना इस्कॉनने दिल्लीत उभा केलेल्या भगवद्गगीतेच्या जगातील सगळ्यात मोठ्या प्रचार-प्रसार केंद्राची पाहणी राज ठाकरे यांनी करावी. या संदर्भातील निमंत्रणदेखील यावेळी दास यांनी ठाकरे यांना दिले. यावर राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत. भगवद्गगीता आणि प्रभू रामचंद्र ही भारताची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यासाठी आपण आणि आपला पक्ष सदैव तत्पर राहिल ,असे आश्वस्त केल्याचे दास यांनी सांगितले.
इस्कॉनच्या वतीने संपूर्ण देशभरातील तीर्थक्षेत्रांमध्ये व इतरही मोठ्या शहरांमध्ये मंदिरे उभी आहेत. गोसेवा सारखे अनेक प्रकल्प सुरू आहेत. मात्र समाजात मोठ्या प्रमाणावर गोहत्या होते. गोवंश हत्याबंदी कायदे करुनही काहीही फरक पडत नाही. अशा परिस्थितीत गोहत्या थांबवणे हेच सध्या हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे धर्म आणि कर्म बनले असल्याचे याप्रसंगी दास यांनी सांगितले. गोहत्या कायमच्या बंद करुन गोधनाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. अशी अपेक्षा राज ठाकरे यांच्याकडून व्यक्त केली.
तसेच सोलापुर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मदतीने इस्कॉनच्या शाखा वाढवणे, गोसेवेसाठी मदत करणे, रथयात्रा काढणे ,भगवद्गगीतेचा प्रचार-प्रसार करणे यासाठी आम्हाला मोठी मदत होते. पण हीच मदत संपूर्ण राज्यभरात झाली तर निश्चितच गोधनाचे संवर्धन होईल आणि आजची सोशल मीडियावर गुंग असलेली तरुणाई भगवद्गगीता हातात घेईल. यासाठी आपण प्रयत्न करावे. अशी दास यांनी व्यक्त केली.