गुरूवारी सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये 97 कोरोना रूग्ण आढळले
पंढरपूर – सोलापूर शहरात गुरूवारी 25 फेब्रुवारी रोजी 56 कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली असून जिल्हा ग्रामीणमध्ये 41 जणांची भर पडली आहे. जिल्ह्यात एकूण 97 कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
सोलापूर शहरात 23 जण ॲन्टिजन तर 33 जण आरटीपीसीआर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आजवर सोलापूर शहरात 12 हजार 307 रूग्ण आढळून आले असून यापैकी 653 जणांनी आपले प्राण या आजारात गमावले आहेत. सध्या 376 जणांवर उपचार सुरू आहेत तर 11 हजार 278 जण बरे होवून घरी गेले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरूवारी 41 रूग्ण वाढले आहेत तर 32 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. गुरूवारी सर्वाधिक रूग्ण हे माढा ग्रामीणमध्ये 13 आढळून आले आहेत. यापाठोपाठ माळशिरस 7, सांगोला 6, बार्शी 5, पंढरपूर व करमाळा तालुक्यात प्रत्येकी चार कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
ग्रामीणमध्ये 40 हजार 373 रूग्ण सापडले असून 1177 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 419 जण उपचार घेत असून 38 हजार 777 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.