पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामविस्तार ‘द्वि वर्षपूर्ती’निमित्त ऑनलाइन कार्यक्रम
सोलापूर, दि.5- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामविस्ताराच्या द्वितीय वर्षपूर्ती दिनानिमित्त शनिवार, दि. 6 मार्च 2021 रोजी सकाळी अकरा वाजता वालचंद महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांनी दिली.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ‘कोविड-19’ मुळे हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. उद्या (शनिवारी) सकाळी साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व इतर वरिष्ठ अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर अकरा वाजता प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांचे ‘अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि कर्तृत्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यात प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या ऑनलाइन कार्यक्रमाचा https://youtu.be/mUd1V31O6Cs या यूट्यूब लिंकवर विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना लाभ घेता येणार आहे. राज्य शासनाकडून 6 मार्च 2019 रोजी सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामविस्तार करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठात अहिल्यादेवींचा पुतळा, अध्यासन केंद्र निर्मितीची प्रक्रिया सुरू असून या माध्यमातून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे. शनिवारी आयोजित ऑनलाईन व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांनी केले आहे.