महिला दिनी पंढरपूर पोलीस ठाण्याचा कारभार महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे, निर्भया पथकाकडून विविध उपक्रमांचे आयोजन

पंढरपूर– जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंढरपूर शहर पोलीस ठाणे व निर्भया पथकाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज 8 मार्च रोजी शहर पोलीस ठाण्याचा कारभार पोलीस उपनिरीक्षक मनीषा महाडिक यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
जागतिक महिला दिनी शहर पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदार म्हणून अश्‍विनी पवार, अंकिता कौलगे, नम्रता गटकुळ व पौर्णिमा हादगे यांनी काम पाहिले. या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याचा कारभार उत्कृष्ठपणे सांभाळला.

दरम्यान निर्भया पथकाच्या वतीने तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरी महाविद्यालय व वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेत विद्यार्थीनींना कायदेविषयक तसेच संरक्षणात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.यावेळी तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, ग्रामीणचे निरीक्षक प्रशांत भस्मे उपस्थित होते.

शहर पोलीस ठाण्यात शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरूण पवार, उपनिरीक्षक मनीषा महाडिक, पालवी संस्थेच्या प्रमुख मंगलताई शहा यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ.संगीता पाटील, श्रेया भोसले, रेखा चंद्रराव, चारूशीला कुलकर्णी, साधना राऊत, भाग्यश्री शिंदे, वर्षा गायकवाड, दुर्गा माने, ऐश्‍वर्या शिंगटे, शुभांगी जाधव, संध्या राखी, संध्या शेळके, पूजा लवंगकर, सविता दुधभाते, अविंदा गायवाकड, जान्हवी पाटील, हर्षली करकमकर, रेणुका बडवे, गितेश्‍वरी शिंदे, अक्षता करकमकर ,धनश्री आराध्ये यांचा सन्मान करण्यात आला.
यासाठी निर्भया पथकाचे प्रमुख राजेंद्र गाडेकर, पोलीस कर्मचारी गणेश इंगोले, अरबाज खाटीक, कुसूम क्षीरसागर, चंदा निमगिरे, नीता डोकडे, महेश काळे यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!