पंढरपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 15 वा वर्धापन दिन पंढरपुरात रक्तदान व आरोग्य शिबिर भरवून साजरा करण्यात आला आहे.
कोरोनामुळे साधेपणाने पक्षाचा वर्धापनदिन साजरा करत असताना आगामी काळाम सामान्यांचे संसार उभा करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वतीने काम केले जाणार असल्याची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली.
येथील तांबट धर्मशाळेमधे आयोजित कार्यक्रमात सुरूवातीला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानेच आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेउन साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले , कोरोनामुळे देशावर संकट आहे. अशातच रक्ताचा तुटवडा असल्याने कोणताही गाजा-वाजा न करता आपण पक्षांच्या धोरणानुसार वर्धापन शदिन साजरा करीत आहे. मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने यापुढच्या काळात कोरोनामुळे अडचणीत असलेले अनेक संसार पुन्हा उभा करणे, तरूणांच्या हाताला काम देणे, त्यांना उद्योजक म्हणून उभा करणे. असे कार्यक्रम येत्या काळात सोलापूर जिल्हयात राबविले जातील. यासाठी मनसेच्या सैनिकांनी येत्या काळात अधिक जोमाने काम करावे. असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रताप भोसले , महिला अध्यक्ष रंजनाताई इंगोले , उपाध्यक्ष पूजा लवंगकर, स्वप्निल जाधव , मारूती ऐवळे , प्रथमेश पवार , तेजस गांजले , शैलैश धट , शुभम काकडे उपस्थित होते.