सोमवारी जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 26 आढळले
पंढरपूर- सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) सोमवार 15 मार्च रोजी 88 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 26 आढळून आले आहेत.
सोमवारी आलेल्या अहवालानुसार 1321 चाचण्या झाल्या असून यापैकी 1233 निगेटिव्ह आहेत तर 88 पॉझिटिव्ह आहेत. आजच्या अहवालानुसार एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 50 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हा ग्रामीणमध्ये आज सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 26 आढळले असून यात पंढरपूर शहरात 7 तर ग्रामीणमध्ये 19 जणांची नोंद आहे. यापाठोपाठ करमाळा 18, माढा 12 असे यग्ण आढळून आले आहेत. ग्रामीणमध्ये आजवर 14 हजार 692 रूग्ण नोंदले गेले असून यापेकी 1199 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 39 हजार 606 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या 887 जणांना उपचार सुरू आहेत.