पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची परीक्षा
प्रशांत आराध्ये
पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार कै. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होत असून 2 मे ला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची तर आहेच पण ती एक परीक्षाही ठरणार आहे.
नोव्हेंबर 2020 मध्ये भारत भालके यांचे निधन झाले होते. त्यांनी 2009 पासून या तीन सलग निवडणुकांमध्ये येथे विजय मिळविला होता. 2019 ला त्यांनी भाजपाचे उमेदवार ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत एकमेकांना आव्हानं देणा भारत भालके व सुधाकरपंत परिचारक या दोघांचे ही मागील वर्षी निधन झाले आहे.
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आय हे तीनही पक्ष एकत्र आहेत. यापुढील काळात तीनही पक्ष एकत्र लढतील असे त्यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. यामुळे आता पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत एकी किती आहे?हे दिसून येणार आहे. ही जागा 2019 ला राष्ट्रवादीने जिंकली असल्याने सहाजिकच यावर याच पक्षाचा दावा असणार आहे. येथे राष्ट्रवादीकडून कै. भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके अथवा सुपुत्र भगिरथ यांना उमेदवारीची शक्यता आहे. यातच येथे शिवसेनेच्या शैला गोडसे याही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे 2014 पासून दोनवेळा येथे लढून क्रमांक तीनची मते घेणा मंगळवेढ्यातील उद्योजक समाधान आवताडे यांनीही निवडणुकीची तयारी केली असून त्यांचे सतत दौरे सुरू आहेत.
या मतदारसंघातील भाजपाचे नेते असणा आमदार प्रशांत परिचारक हे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांचे बंधू उमेश परिचारक अथवा पुतण्या प्रणव यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशीही चर्चा आहे. भाजपाकडून या जागेची चाचपणी झाली आहे. येथून लढण्यासाठी अन्य काही उमेदवार तयार असल्याचे समजते. या भागावर परिचारक यांची पकड असल्याने भाजपा अगोदर त्यांचाच विचार करणार हे निश्चित.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघा ही निवडणूक होत असून यासाठी अनेक नेत्यांनी तयारी केली आहे. या मतदारसंघाचे कै. भारत भालके यांनी 2009, 2014 व 2019 ला प्रतिनिधीत्व केले आहे. तीनही वेळा त्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून लढून येथे विजय मिळविला होता. जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी हा करिष्मा करून दाखविला होता. आता या मतदारसंघात कोण बाजी माल हे 2 मे रोजी समजणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम..
23 मार्च 2021 रोजी प्रक्रियेला सुरूवात होर्इल 30 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 रोजी छाननी होणार आहे तर 3 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.17 एप्रिल रोजी मतदान होर्इल तर 2 मे 2021 मतमोजणी होणार आहे.