पंढरपूर – मंगळवारी 23 मार्च रोजी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिकाक्षेत्र वगळून ) 227 कोरोनाबाधित रूग्ण वाढले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 54, करमाळा 36 तर पंढरपूर तालुक्यात 35 आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार 4343 चाचण्या झाल्या असून यापैकी 4116 निगेटिव्ह तर 227 पॉझिटिव्ह आहेत. आज 109 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. मंगळवारच्या अहवालानुसार तीन जण कोरोनामुळे मयत असून यात दोन पंढरपूर तालुक्यातील तर 1 करमाळा तालुक्यातील आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 43 हजार 062 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून 1214 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. 40 हजार 242 जणांनी कोरोनावर मात केली असून 1606 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8548 आढळून आले असून 247 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत तर 8084 जणांनी कोेरोनावर मात केली आहे. सध्या 217 जणांवर उपचार सुरू आहेत. आज शहरात 14 तर ग्रामीणमध्ये 21 कोरोनाबधित आढळून आले आहेत.