पंढरपूर– 252 पंंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी तीन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर 12 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत ज्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या मातोश्री जयश्री भारत भालके यांच्यासह डॉ.बी.पी.रोंगे व माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचा समावेश आहे.
17 एप्रिल रोजी मतदान व 2 मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार असून 23 मार्चपासून अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू आहे. शुक्रवारी नागेश प्रकाश पवार रा. पंढरपूर , सौ. शैला धनंजय गोडसे रा. पंढरपूर व इलियास हजियुसूफू शेख रा. इसबावी पंढरपूर या तीन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर बब्रवान पांडुरंग रोंगे यांच्यासाठी बालाजी श्रीपती सुरवसे रा. पंढरपूर, शीतल शिवाजी आसबे रा.गोपाळपूर, भगिरथ भारत भालके रा. सरकोली , जयश्री भारत भालके रा. सरकोली यांच्यासाठी दिलीप पांडुरंग कोरके यांनी, अॅड. रवीकिरण सुरेश कोळेकर रा. रेड्डे, सुधाकर रामदास बंदपट्टे रा.पंढरपूर, लक्ष्मण शंकररराव जोमकांबळे रा.लक्ष्मी टाकळी, नागेश आण्णासाहेब भोसले रा. पंढरपूर यांच्यासाठी संतोष सोपान डोंगरे, राजाराम कोंडीबा भोसले रा. वाढेगाव ता. सांगोला यांच्यासाठी चंद्रकांत शामराव क्षीरसागर, कपिलदेव शंकर कोळी रा. सोलापूर यांच्यासाठी अॅड.प्रणेय राजेंद्र कांबळे, सुदर्शन पांडुरंग मसुरे रा. इसबावी, बिरूदेव सुखदेव पापरे रा. जगदडेवाडी ता. दौंड यांनी उमेदवारी अर्ज नेले आहे.
या निवडणुकीसाठी आतापर्यंत आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर 52 जणांनी अर्ज नेले आहेत.