सोमवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 326 कोरोना रूग्ण वाढले, तीन जणांचा मृत्यू
पंढरपूर – सोमवार 29 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 326 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर तीनजण मयत आहेत.
सोमवारच्या अहवालानुसार 2 हजार917 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 2 हजार 591 चाचण्या निगेटिव्ह तर 326 पॉझिटिव्ह आहेत. आज 151 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत एकूण 44 हजार 928 कोरोनाबाधित आढळून आले असून या आजारात 1225 जणांनी प्राण गमावले आहेत तर 40 हजार 900 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या 2803 जणांवर उपचार सुरू आहेत.
सोमवारी सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 90 आढळून आले असून यापाठोपाठ सांगोला 60, करमाळा तालुक्यात 52 ची नोंद आहे. माळशिरस 39, पंढरपूर 33 अशी रुग्णांची नोंद आहे. आजच्या अहवालानुसार करमाळा, माढा व मोहोळ तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण कोरोनामुळे दगावला आहे.