पंढरपूर – गुरूवार 1 एप्रिल 2021 रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 352 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारच्या अहवालानुसार सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 76 यापाठोपाठ माळशिरस तालुका 75, माढा 59, माळशिरस 43 तर पंढरपूर तालुक्यात 46 ची नोंद आहे. आजच्या अहवालानुसार जे चार मृत्यू नोंदले गेले आहेत. यात बार्शी तालुक्यात दोन तर मोहोळ व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. दिवसात एकूण 5 हजार 645 चाचण्या झाल्या असून यापैकी 5293 निगेटिव्ह आहेत तर 352 पॉझिटिव्ह आहेत. 293 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये 46 हजार 001 कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी 1237 जणांचा या आजारात मृत्यू झाला आहे तर 41 हजार 475 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3 हजार 289 जणांवर उपचार सुरू आहेत.
सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8 हजार 948 इतके आढळून आले असून यापैकी 250 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 हजार 267 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 431 जणांवर उपचार सुरू आहेत. गुरूवारी पंढरपूर शहरात 9 तर ग्रामीणमध्ये 37 कोरोना रूग्णांची नोंद आहे.