पंढरपूर – ज्येष्ठ पत्रकार तथा भागवत कथाकार बाळासाहेब बडवे यांनी लिहिलेल्या श्रीमद् भागवत कथासार या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक 6 जुलै रोजी श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते होत आहे होत आहे.
झूम मीटिंग द्वारे ऑनलाइन होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर , सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. मारुती नवले , एम आय टी युनिव्हर्सिटी चे संचालक प्रा. वि दा कराड आदी मान्यवर प्रबोधन करणार आहेत . कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमास असलेल्या मर्यादा लक्षात घेता झुम लिंक द्वारे सर्व मान्यवर एकत्रित येऊन या पुस्तकाचे अनावरण करणार आहे . अनेक भागवताचार्य , वारकरी सांप्रदायिक मंडळी , पत्रकार या झूम लिंक द्वारे समारंभात सहभागी होतील .
श्रीमद् भागवत कथा सार या ग्रंथामध्ये भागवताचे निरूपण असून संपूर्ण बारा स्कंधा च्या माध्यमातून साकार झालेल्या आध्यात्मिक स्थितीचे सद्यस्थितीतील सामाजिक परिस्थितीशी असणारे साधर्म्य आणि त्या संबंधीचे विवेचन आहे .
430 पृष्ठाच्या या ग्रंथाचे प्रकाशन विजय भटकर यांच्या मल्टीवर्सिटी प्रकाशनाने केले असून स्वामी गोविंददेव गिरी यांनी प्रस्तावना दिली आहे
मल्टीवर्सिटी या जागतिक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने हा प्रकाशन सोहळा सर्वत्र प्रसारित करण्यात येणार आहे .