पंढरपूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये आषाढीच्या काळात 17 ते 25 जुलै 2021 या दरम्यान संचारबंदी पुकारण्यात आली असून या वारीच्या नियोजनासंदर्भात जे नियम आहेत ते प्रशासनाने जाहीर केले आहेत. यात 18 ते 25 जुलै दरम्यान चंद्रभागा नदीत स्नानासाठी केवळ परवानगीधारक वारकर्यांना (म्हणजेच मानाच्या पालख्यांसमवेत येणारे वारकरी) जाता येणार असून अन्य लोकांना येथे स्नानास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच संचारबंदी काळात राज्य परिवहन महामंडळाची बससेवा व अत्यावश्यक वाहतूक सेवा वगळता सर्वप्रकारच्या खासगी वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान याबाबतची नियमावली सविस्तरपणे खाली दिली आहे..