पंढरपूर – शुक्रवार 9 जुलै रोजी रात्रौ व आज पहाटेपर्यंत पंढरपूर शहरात 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यापाठोपाठ कासेगाव मंडळात 57 मि.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे.
पंढरपूर तालुक्यात एकूण 273 मि.मी. तर सरासरी 30.33 मि.मी. पाऊस झाला आहे. बरेच दिवस दमदार पावसाच्या प्रतीक्षेत हा भाग होता. पंढरपूर शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून सखल भागात पाणी साठले आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यात शुक्रवारी रात्रौ दमदार हजेरी लावली आहे.
मंडल निहाय पाऊस पुढील प्रमाणेः करकंब 2, पटवर्धन कुरोली 17 ,भंडीशेगाव 35, भाळवणी 27, कासेगाव 57, पंढरपूर 71 , तुंगत 15 , चळे 30, पुळूज 19 मि.मी. एकूण पाऊस 273 मि.मी.सरासरी 30.33 मि.मी.