कौतुकास्पद : पंढरपूर तहसीलचे समाजकार्य, विक्रमी रक्तदान शिबिर घेतले

पंढरपूर – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे गंभीर आजारातील रुग्णांना तसेच अपघातात जखमी होणार्‍यांना वेळेत रक्त न मिळाल्यास जीवितास धोका होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून तसेच समाजाप्रती आपले काही देणे लागते या जाणीवेतून तहसील कार्यालय पंढरपूर येथे पंढरपूर ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 351 जणांनी सहभाग घेतला.
यास उपक्रमासाठी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यावेळी जास्ती जास्त रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले. यात तहसील व दुय्यम निंबधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी , पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार , सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे सदस्य, जेष्ठ नागरिक यांनी रक्तदान केले. यावेळी हनुमंत भगवानराव मोरे (वय-51वर्षे) यांनी आजवर 51 व्या वेळा रक्तदान केले तसेच त्यांच्या कुटुबांतील सर्व सदस्यांनीही शिबिरात सहभाग घेतला. रवीराज जाधव व हितेश चव्हाण यांनी लातूर जिल्ह्यातून येवून रक्तदान केले. तर अनिल यलमार यांनीही आतापर्यंत 78 वेळेस रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरात व्यवस्था करण्यात आली होती असेही, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितल.े
या शिबीराचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिरास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे तसेच आयोजकाचे कौतुकही यावेळी केले. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही या उपक्रमास भेट दिली यावेळी तहसिलदार व सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले. बेल्हेकर यांनी स्वता: रक्तदान करुन सहकार्यांना प्रोत्साहित केले.
.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!