पंढपूर- गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे भीमा व नीरा खोर्यात पुनगरागमन बुधवारपासून झाले असून आज गुरूवारी सकाळपर्यंत अनेक धरणांवर दोनशे मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान उजनीत येणार्या पाण्याचा विसर्ग ही आता दहा हजार क्युसेकच्या वाटेवर असून हा प्रकल्प वजा 1.30 टक्के आहे. येत्या काही तासात तो उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होईल..
मागील चोवीस तासात भीमा नीरा खोर्यातील मुळशी धरणावर 294 मि.मी. तर टेमघर 250, नीरा देवघर 249, पवना 232 , वडीवळे 198, वरसगाव 153, पानशेत 155, डिंभे 129, गुंजवणी 115 यासह आंध्रा 79, कासारसाई 60, चासकमान 68, कलमोडी 94, खडकवासला 32, माणिकडोह 63 मि.मी. अशा पावसाची नोंद असून उजनीवर 7 मि.मी. ची नोंद अहे. अन्य धरणांवर ही मध्यम व हलका पाऊस झाला आहे.
भीमा उपखोर्यातील धरणांवर व नदी परिसरात होत असलेल्या पावसाने उजनीत दौंडजवळून मिसळणारा विसर्ग हा दहा हजाराकडे वाटचाल करत असून सकाळी तो 9 हजार 700 क्युसेक होता तर धरण वजा 1.30 टक्के आहे. मागील चोवीस तासात दोन टक्के ते वधारले असून आता सायंकाळपर्यंत ते उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होईल.