पंढरपूर- भीमा व नीरा खोर्यात काही धरणांवर मध्मम स्वरुपाचा पाऊस नोंदला गेला आहे. मुळा व मुठा नदी परिसरात झालेल्या पर्जन्यमानामुळे खडकवासला धरणातून साडेतीन हजार क्युसेक पाणी सोडले जात असल्याने पुणे बंडगार्डन विसर्ग अकरा हजार क्युसेक झाला आहे.
तर नीरा नदी परिसरातील पावसाने सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800 क्युसेक
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. तर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून सकाळी 7 वाजता तो 13 हजार 746 क्युसेक इयका करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाने टक्केवारी ची चाळीशी पार केली आहे. धरणात एकूण पाणीसाठा 85.48 tmc इतका झाला आहे.