बार्शीच्या रामभाई रक्तपेढीत महिलांना 50 टक्के सवलत ; असा उपक्रम राबविणारी एकमेव ब्लड बँक
बार्शी : राज्यातील महिला व बालिका यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे तसेच महिलांविषयी सामाजिक बांधलकीतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत (ता.८ मार्च
राज्यातील सर्व सामाजिक व आर्थिकस्तरातील महिला व बालिका यांना ५० टक्के सवलतीच्या दरात
रक्त पुरवठा करण्यासाठी नारी शक्ती सन्मान योजना बार्शीच्या इंडियन रेडक्रॉस सोसोयटीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीने सुरू केली आहे.
या योजने अंतर्गत बालिका व महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात रक्तपुरवठा करणारी बाशींची श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी ही राज्यातील एकमेव असल्याची माहिती रक्तपेठीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देतना श्री. कुंकूलोळ म्हणाले, रक्तपेढीच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल देशाचे महामहीम राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांनी श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीस वेळोवेळी गौरवले आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलीत या रक्तपेढीची २ जानेवारी १९७९ रोजी बार्शीत स्थापना करण्यात आली.
सोलापूर सारख्या दुष्काळी व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यात तालुकास्तरावर इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित श्रीमान रामभाई शाह ही रक्तपेढी मागील चार दशकाहून अधिक म्हणजे ४१ वर्षापासून रक्तदान चळवळीचे कार्य अखंडितपणे करत आहे.
जागतिकस्तरावरील इंडियन रेड क्रॉस सोसायटी या सामाजिक संस्थेला नुकतेच १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या
निमित्ताने संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त एक विधायक व व्यापक समाज उपयोगी उपक्रमांतर्गत नारी शक्ती सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. त्याव्दारे महिला आणि बालिका यांना ५० टक्के इतक्या सवलतीच्या दरात रक्तपुरवठा करण्यात येत आहे.
यापूर्वी इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीने ५८ वर्षे वयाच्या पुढील ज्येष्ठ
नागरिकांसाठी मागील पाच वर्षापासून ५० टक्के सवलतीच्या दरात रक्तपुरवठा सुरु केला असून तो आजही अविरतपणे सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून २०१५ ते २०१९ या चार वर्षाच्या काळात रक्तपेढीने ज्येष्ठ नागरिकांना सुमारे १० हजार ८१६ ब्लड बॅग्ज एवढा रक्तपुरवठा केला आहे.
त्या माध्यमातून सुमारे ५१ लाख ९७
हजार ३६० रुपयांचा लाभ रक्तपेढीने गरीब व गरजू रुग्णांना मिळवून दिला आहे. बार्शीची श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी ही संपूर्ण संगणकीकृत रक्तपेढी असून १०० टक्के रक्तविघटनाची सोय असून त्यासाठी अद्ययावत मशिनरी देखील उपलब्ध आहे. अॅटोमॅटीक मशिनव्दारे रक्तगट व क्रॉसमॅच करण्याची सुविधा व फोर्थ जनरेशनव्दारे एलायझा चाचणी उपलब्ध आहे. जगातील सर्वोत्तम नॅट चाचणीव्दारे रक्त तपासणीची सोय असलेली एकमेव रक्तपेढी आहे.
रक्तदान चळवळी अंतर्गत ऐच्छीक रक्तदाते निर्माण करण्यासाठी रक्तपेढी आपल्या दारी या
उपक्रमांतर्गत थेट रक्तदात्यांकडे जाऊन रक्त संकलन करण्यासाठी रक्तपेढीकडे सर्व सोयींनीयुक्त अशा आधुनिक मोबाईल व्हॅनची सोय आहे. पत्रकार परिषदेस सचिव सुभाष जवळेकर, व्यवस्थापक प्रशांत बुडूख, रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य संतोष सुर्यवंशी, शहाजी फुरडे पाटील, विजय निलाखे उपस्थित होते.
* आरोग्य मंत्र्यांनी केले कौतुक *
श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या कार्याची राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेवून एका पत्राव्दारे रक्तपेढी व उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांचे कौतुक केले आहे.