कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामीणमध्ये उपाय योजना, खेडभोसेत फवारणी
पंढरपूर -कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात ही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यातील खेडभोसे गावात खबरदारी म्हणून आज २७ मार्च रोजी सोडियम हायपोक्लोराईट सोल्यूशनची फवारणी करण्यात आली.
येथील सर्व सार्वजनिक इमारती, व्यापारी संकुल,सार्वजनिक रस्ते, ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तसेच गावातील सार्वजनिक जागा, चौक,घरापुढील कट्टे व परिसर या ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे. यासाठी गावचे माजी उपसरपंच श्री सुरेश माणिक पवार यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला . त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. दरम्यान ग्रामस्थांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपल्या घरात राहावे, कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.