बँक ऑफ महाराष्ट्रने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले १ कोटी ₹

मुंबई दिनांक २८: बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्यावतीने श्री. विजय कांबळे जनरल मॅनेजर, मुंबई यांनी काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच मुख्यमंत्री कार्यालयात जमा केला.

कोविड १९ या विषाणुविरुद्ध च्या लढ्यात अबालवृद्ध सहभागी होत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनीही यात सहभागी होत आपले योगदान दिले असून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे.

या मदतीसह आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण २८५ कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रला आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

इंग्रजीत

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!