सोलापूर जिल्हाः ग्रामीणमध्ये आज 25 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले
पंढरपूर– जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी 25 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत विविध तालुक्यातील एकूण 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवार 8 जून रोजी आठ अहवाल प्राप्त झाले असून यापैकी सहा निगेटिव्ह आहेत तर 2 पॉझिटिव्ह आहेत. यातील एक रूग्ण हा बार्शी तालुक्यातील जामगावचा आहे तर दुसरा रूग्ण हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील नवीन विडी घरकुल परिसरातील आहे. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 82 ( यातील एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आहे)इतकी झाली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून )प्रशासनाने आजपर्यंत परराज्य व परजिल्ह्यातून 15 हजार 920 जणांना घरात विलगीकरण केले होते. यापैकी 13 हजार 137 जणांचा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर 2783 जण अद्याप गृह विलगीकरणात आहेत. तर अकरा तालुक्यात प्रशासनाने 4 हजार 435 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. यापैकी 3806 जणांचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे तर 629 जण अद्याप ही विलगीकरणात आहेत. आज 65 जणांना संस्थात्मक विलगीकरणातून सोडण्यात आले आहे.
दरम्यान आजवर ग्रामीण क्षेत्रात 1631 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 1566 जणांचे अहवाल असून यात 81 जर पॉझिटिव्ह आहेत तर 1485 अहवाल हे निगेटिव्ह आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या रूग्णालयात 45 जणांवर उपचार सुरू आहेत यात 30 पुरूष व 15 महिलांचा समावेश आहे.