सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शनिवारी 27 कोरोना रूग्ण वाढले
पंढरपूर, दि.27 – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) शनिवार 27 जून रोजी आणखी 27 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 293 इतकी झाली असून यापैकी 118 जण उपचार घेवून घरी परतले आहेत तर 160 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान शनिवारी कोरोनावर मात करून 19 रूग्ण आपल्या घरी परतले आहेत. शनिवारी एकूण 238 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 211 निगेटिव्ह आले तर 27 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 32 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 3423 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 3391 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 292 आहेत तर 3099 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शनिवारी जे 27 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत यात दक्षिण सोलापूरमध्ये 5, उत्तर सोलापूर 4,अक्कलकोट 11, बार्शी 5, माढा1 व मोाहोळ तालुक्यातील एक जणांचा यात समावेश आहे.
आज सापडलेल्या रूग्णात उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील 3 तर बिबीदारफळ येथे 1. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन 1, बोरामणी येथील 4 जणांचा समावेश आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव 3, सलगर 2 तर अक्कलकोट शहर 4, किस्तके मळा 1 व गुरववाडीत 1 जणाचा समावेश आहे. बार्शी तालुक्यातील बार्शी शहरात 4 तर साकत पिंपरी येथील एकाचा समावेश आहे. माढा तालुक्यातील सीना दारफळ येथे एक रूग्ण आज आढळून आला आहे तर मोहोळ तालुक्यातील हिंगणी (नि.) येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण 293 रूग्ण आजवर आढळून आले असून यातील एक जण पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आला होता.
आजवर कोरोनाचे सापडलेले तालुकानिहाय एकूण रूग्ण- दक्षिण सोलापूर 127, अक्कलकोट 61, बार्शी 44, उत्तर सोलापूर 22, मोहोळ 15, माढा 8, पंढरपूर 7, माळशिरस 5, सांगोला 3, करमाळा 1.
उपचार सुरू असलेले तालुकानिहाय रूग्ण- द.सोलापूर 67, अक्कलकोट 45, बार्शी 24, मोहोळ 11, उ. सोलापूर 10, करमाळा, माढा व माळशिरस प्रत्येकी 1.