जिल्हा ग्रामीणमध्ये 12 रूग्ण वाढले; मात्र पंढरपूरकरांना दिलासा : 52 जणांचे अहवाल निगेटिव्ह
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) रविवार 5 जुलै रोजी आणखी 12कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 531 इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आजवर 25 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान पंढरपूरकरांना दिलासादायक बातमी असून येथील 53 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
रविवारी एकूण 66 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 54 निगेटिव्ह आले तर 12 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 39 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 4650 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 4611 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 531 आहेत तर 4080 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
रविवारी 12 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले यात बार्शी तालुक्यातील 4 जण असून यात सुखदेवनगर 1, कसबा पेठ 1, बारंगुळे प्लॉट 1, उपळाई रोड बार्शी 1. उत्तर सोलापूर तालुक्यात तीन रूग्ण सापडले असून यात मार्डी 1, नान्नज 1, बेलाटी 1. दक्षिण सोलापूर तालुक्यात 4 रूग्ण आढळून आले आहेत यात नवीन विडीघरकुल 1, हात्तुर 1,मुळेगाव 1, बोरामणी 1. तर अक्कलकोट तालुक्यात जेऊरवाडी येथे 1 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर 532 रूग्ण आढळून आहेत (यात एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आहे) सध्या 288 जणांवर उपचार सुरू असून कोरोनावर मात केलेल्या 219 जणांना घरी सोडण्यात आले आहे. .

पंढरपूर व परिसरात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 124 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणी घेण्यात आले असून यापैकी 53 जणांचे अहवाल रविवारी 5 जुलै रोजी प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले. दरम्यान 71 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
दरम्यान काल 4 जुलै रोजी जे सात रूग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती गोळा करण्यात आली असून यात हायरिस्कमधील 65 तर लो रिस्कमधील 143 जणांचा समावेश आहे. आजवर पंढरपूरमध्ये 738 जणांचे स्वॅब नमुने कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले असून यापैकी 667 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. 30 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. यापैकी आठ रूग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे तर 22 अॅटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. आजवर आढळलेल्या 30 पॉझिटिव्ह रूग्णात पंढरपूर शहर व तालुक्यातील 25 तर मुंबई, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा येथील पाच जणांचा समावेश आहे.