कोरोनामुळे खर्डीतील मरीआई देवीची यात्रा रद्द , गावात पोलीस बंदोबस्त
अमोल कुलकर्णी
खर्डी – पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे आषाढ महिन्यात भरणारी मरीआई देवीची यात्रा यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
अन्यवेळी यात्रेत गावात सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हजारो कोंबड्या आणि शेकडो बोकडांचा बळी दिला जातात. यावर्षी कोरोनामुळे ही यात्रा रद्द झाली आहे. गावातील मरीआई देवी मंदिराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ग्रामप्रशासनाच्यावतीने गावात रिक्षांमधून बंदची घोषणा करण्यात आली होती.
इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर होणारी जत्रा रद्द झाल्याने परगावाहून येणारे पाहुणेरावळे यांना मांसाहाराला मुकावे लागले याची चर्चा गावात रंगली होती. यावेळी खर्डी गावचे सरपंच रमेश हाके,उपसरपंच प्रणव परिचारक यासह ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन करीत गाव बंद ठेवले. पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट एएसआय रमाकांत ननावरे, गणेश बाबर,गणेश इंगोल,शिंदे हे कर्मचारी उपस्थित होते.