पंढरपूर,- कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी ३१ जुलैपर्यंतच बंदच असणार आहे. असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
कोरोनामुळे श्री विठ्ठल मंदिर हे १७ मार्चपासून बंदच आहे. कोरोनामुळे ४ महिने भाविकांना दर्शनासाठी बंदच आहेत. मात्र सर्व नित्योपचार परंपरेप्रमाणे सुरू आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन आँनलाइन घेण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध आहे.