पंढरपूर सिंहगडच्या ऑनलाइन सेमिनारमध्ये १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग
पंढरपूर – कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने १२ वी नंतर पुढे काय? तसेच व्यवसायिक शैक्षणिक पाञता, शिष्यवृत्ती विषयी शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन फेसबुक लाइव्ह आणि युट्यूब लाइव्ह च्या माध्यमातून सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यायात १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.सुरूवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्वागत केले.पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी सुरुवातीला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना पीपीटीद्वारे ऑनलाइन पद्धतीने फेसबुकलाइव्ह व युट्यूबलाइव्हच्या माध्यमातून १२ वी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी पुढे कोण-कोणते शिक्षण घेऊ शकतात. याची माहिती देण्यात आली. यासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पाञता, शिक्षणासाठी शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती याविषयी मार्गदर्शन केले.
या सेमिनारमध्ये ऑनलाइन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रा. अनिल निकम यांना प्रवेशासाठी येणा-या अडचणी, शैक्षणिक गुणवत्ता या विषयी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.सद्या सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात. या संचारबंदी च्या कालावधीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने १२ वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १२ वी नंतर पुढे काय? या विषयी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले. हा सेमीनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील अमोल नवले, अमोल लोखंडे यांनी परिश्रम घेतले.