शनिवारी पंढरपूर शहरात 21 तर ग्रामीणमध्ये 5 कोरोना रूग्ण आढळले
पंढरपूर – आज शनिवारी 18 जुलै रोजी पंढरपूर शहरात 21 तर ग्रामीणमध्ये 5 असे एकूण 26 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 157 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
113 अहवाल प्राप्त असून निगेटिव्ह 87 तर पाँझिटिव्ह 26 आहेत. शहरात 21 तर एकलासपूरमध्ये 4 तर पचळूज मध्ये 1 रूग्ण आढळला आहे. 116 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. आजवर 39 जण बरे झाले आहेत. तर 2 जण मयत आहेत
आजवर पंढरपूर शहरात 115, ग्रामीणमध्ये 34 तर इतर तालुके व जिल्हयातील 8 रूग्ण आढळले आहेत.