मंगळवारी पंढरपूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 21 ने वाढला, एकूण संख्या 233
पंढरपूर – आज मंगळवारी 21 जुलै रोजी पंढरपूर शहरात 13 तर ग्रामीणमध्ये 8 असे एकूण 21कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 233 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
आज 83 अहवाल मिळाले पैकी 62 निगेटिव्ह आहेत. 21 पाँझिटिव्ह आहेत. अद्याप 70 अहवाल प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात आज टाकळी 2, बोहाळी , देगाव, नारायण चिंचोली, वाखरी, भंडीशेगाव, भोसे येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आजवर 46 जण बरे झाले आहेत. तर 2 जण मयत आहेत. शहरातील 135 तर ग्रामीण मधील 49 व इतर तालुक्यातील 1 असे 185 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज मंगळवारी rtpcr test 11 रुग्ण पाँझिटिव्ह तर rapid antigen मध्ये 10 पाँझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. Rtpcr च्या आज 34 test झाल्या पैकी 23 निगेटिव्ह 11 पाँझिटिव्ह तर rapid antigen 49 test पैकी 39 निगेटिव्ह तर 10 पाँझिटिव्ह आहेत.