पंढरपूर सिंहगडमध्ये “संगणक शास्त्रातील प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञान” या विषयावर ५ दिवसीय वेबिनार संपन्न
पंढरपूर– कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगला महाविद्यालयात संगणक विभागात “संगणक शास्त्रातील प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञान” या विषयावर ५ दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. ते उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी संघटना “अक्सेस” व आय.ई.आय. स्टुडंट्स चाप्टर यांच्या वतीने ते आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये आय. टी. क्षेत्रातील काही तज्ज्ञ वक्ते तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांना गूगल मीट तथा झूम मोबाइल अँपच्या माध्यमातून ऑनलाइन व्याख्याने दिली. कोरोना महामारीच्या काळातही विद्यार्थ्यांनी व्याख्यानांचा घरी बसून आपल्या मोबाइल द्वारे लाभ घेतला.
या वेबिनार सिरीस मार्फत दिवस १ ते ५ दरम्यान डॉ. अमोल आडमुठे, मंदार गुरव, माजी विद्यार्थी अजित सरवळे, प्रा. प्रकाश वाघमोडे व अमोल बांदल यांनी अनुक्रमे “संगणक अभियांत्रिकीतील संशोधनाच्या संधी”, “क्लाऊड कॉम्पुटिंग”, “हाय परफॉर्मन्स कॉम्पुटिंग”, “डॉट नेट विथ एमव्हीसी मॉडेल”, “रेस्ट सर्विसेस विथ नोड-जे एस व मोंगो-डीबी” इत्यादी विषयांवर व्याख्याने दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील विद्यार्थी संघटना अॅक्सेस चे शिक्षक समन्वयक प्रा. व्ही. ए. धोत्रे यांनी तसेच आय. ई. आय. स्टुडंट्स चाप्टर चे सिंहगडच्या संगणक विभागाचे सल्लागार प्रा. एस. व्ही. पिंगळे व समन्वयक प्रा. आर. ए. टाकळीकर यांनी काम पाहिले अशी माहिती संगणक विभाग प्रमुख प्रा. एन. एम. सावंत यांनी दिली.
या ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी तज्ज्ञांचे स्वागत विभागप्रमुख प्रा. एन. एम. सावंत व प्रा. एस. व्ही. पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अमोल बांदल, सॉफ्टवेअर डेव्हलपर,बिझीबीज लॉजिस्टिकस प्रा. लि. यांच्या व्याख्यानाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. ए. टाकळीकर यांनी केले, तर तज्ज्ञांचे आभार प्रा. व्ही. ए. धोत्रे यांनी मानले.