पंढरपूरच्या आरोग्य सभापतिंकडून पाच हजार कुटुंबांना आर्सेनिक गोळ्यांचे वितरण
पंढरपूर:- शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून यावर मात करण्यासाठी आरोग्य सभापती विवेक परदेशी यांच्या वतीने कंटेनमेंट झोनमधील व इतर पाच हजाराहून अधिक कुटुंबांना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप केले आहे.
पंढरपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे.प्रशासन व आरोग्य विभाग तातडीने उपाययोजना करत आहे. कोरोनाची साखळी शोधण्याचा व तोडण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल व त्यांनी शासनाचे नियमाचे पालन केले तर निश्चितच कोरोना शपासून आपला बचाव होईल असे सभापती परदेशी यांनी सांगितले.
जेव्हा शहरामधील पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळला, त्यावेळी तातडीने काळा मारुती चौक जवळीक कंटेनमेंट झोन मध्ये सभापती परदेशी यांनी वतीने आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाची सविस्तर माहिती देण्यात आली व घरोघरी औषधे पोहोच करण्यात आली होती. पंढरपुरातील बरेच कंटेनमेंट झोनमध्ये नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टरांच्या वतीने प्रशासनाच्या सहकार्याने औषधे, काढा देण्यात येत आहे, असे कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, आरोग्य विभाग, नगरपालिकेचे झोनल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाने उपलब्ध होईल तशी आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधे वितरित करण्यात येत आहे. आजपर्यंत गजानन नगर, गणेश नगर, येळे वस्ती, अंबाबाई पटांगणा कडील काही भाग, रोहिदास चौक येथील दोन झोन व शिंदेशाही लिंक रोड, रेल्वे कॉलनी या सर्व कंटेमेंट झोनमध्ये आर्सेनिक अल्बम ३० औषध देण्यात आली तसेच नगरपालिकेच्या कर्मचारी मित्र परिवार, सफाई कर्मचारी, पेट्रोल पंप वरील कर्मचारी आशा कर्मचारी, कोव्हिड वॉरिअर व प्रभाग क्रं १६ मधील रहिवासी, पद्मावती वसाहत ते परदेशी नगर व माळी वस्ती या भागात गोळ्या वितरित झाल्या आहेत.
पंढरपुरातील नामवंत होमिओपॅथीक डॉक्टर संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाने सभापती परदेशी यांच्या वतीने हे औषध दिले जात आहे. उपलब्धताव मार्गदर्शना नुसार त्यावश्यक भागात आणखी औषध देण्यात येणार आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला निश्चितच मदत होइल ,असे डॉ .देशमुख यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटाबरोबर साथीच्या आजारावर मात करण्यासाठी चांगली जीवन शैली असणे आवश्यक आहे. यासाठी पुरेशी झोप घेणे, सकाळी व सायंकाळी १० मिनिटे व्यायाम, प्राणायाम, योगासन, मेडिटेशन नियमित करावे तसेच ताजे अन्न ग्रहण करावे, जड अन्न टाळावे, मोबाईल शचा वापर सतत करु नये. असे आवाहन सभापती परदेशी यांनी केले आहे.
कंटेमेंट झोनमध्ये नागरिकांची थर्मल मशीन व पल्सऑक्सिमीटरच्या माध्यमातून तपासणी होत आहे. जेष्ठ नागरिक व लहान मुलांकडे प्रशासनाचे विषेश लक्ष आहे तसेच नगरपालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण सतत केले जात आहे.
– विवेक परदेशी, आरोग्य सभापती