सोलापूरचा कोरोना मृत्यूदर 10 वरून 5.7 टक्क्यांवर आला
सोलापूर -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरासाठी एक दिलासादायक बातमी आहे, येथील मृत्यूदर आता 5.7 टक्क्यावर आला आहे.
राज्यातील इतर शहरांच्यामानाने सोलापूरचा कोरोना मृत्युदर सर्वाधिक होता, मात्र जिल्हा प्रशासन ,महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या प्रयत्नाला आता यश येताना दिसत आहे, काही दिवसापूर्वी कोरोनाचा मृत्युदर 10 टक्क्यांवर गेला होता.तो आता 5.7 टक्क्यांवर अआल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. मागील काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागांमध्ये रॅपिड अँटीजन चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर रुग्णावर उपचार करण्यासाठी सोयीस्कर होत आहे ,
शुक्रवारी भर पावसात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी भागातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेवक गुरुशांत धुतुरंगावकर यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या रॅपिड एजंट एस शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे भर पावसात सुद्धा नागरिकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला. शंभराहून अधिक चाचण्या यावेळी घेण्यात आल्या. त्यामध्ये एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यावेळी सभागृहनेते श्रीनिवास करली, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेविका अनिता कोंडी यांची उपस्थिती होती.
महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रतिबंधित क्षेत्रातील को -मोरबीड लोकांची तपासणी करण्यात येणार असून यात पाच ते सात टक्क्यांपर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सहज शक्य होत आहे.जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने केलेल्या नियोजनामुळे 24 तासात मृत पावणाऱ्यांचे प्रमाण हे 20 टक्क्यावरून पाच टक्क्यांवर आल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे. अलगीकरण केंद्रातील सुविधा वाढविण्यात येणार असून उद्यापासून या केंद्रातील लोकांना गरम पाणी मिळणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली आहे.