शनिवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 68 कोरोनाबाधित वाढले, एकूण संख्या 350
पंढरपूर – आज शनिवारी 25 जुलै रोजी पंढरपूर शहर 48 व ग्रामीणमध्ये 20 असे 68 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 350 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
आज 374 अहवाल मिळाले पैकी 306 निगेटिव्ह आहेत. 68 पाँझिटिव्ह आहेत. अद्याप 264 अहवाल प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात आंबे 1, सरकोली 5, कोर्टी 1, देगाव 8, भंडीशेगाव 4, फुलचिंचोली 1 येथे रूग्ण असे 20 रूग्ण आढळले आहेत. शहरात 48 रूग्ण वाढले आहेत.
आज 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे , त्यांना घरी पाठविण्यात आले. आजवर 94जण बरे झाले आहेत. तर 5 जण मयत आहेत. शहरातील 174 तर ग्रामीण मधील 75 व इतर तालुक्यातील 2 असे 251 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज rapid test 164 करण्यात आल्या पैकी 24 पाँझिटिव्ह तर rtpcr 210 अहवाल प्राप्त झाले पैकी 44 पाँझिटिव्ह आहेत.