पुणे विभागात 46 हजार 620 जणांची कोरोनावर मात
पुणे दि. 25 :- पुणे विभागातील 46 हजार 620 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजार 405 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 31 हजार 522 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 2 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 60 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 65 हजार 591 बाधित रुग्ण असून कोरोना बाधित 40 हजार 45 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अँक्टिव रुग्ण संख्या 23 हजार 927 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 562, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 117 व पुणे कॅन्टोंन्मेंट 174, खडकी विभागातील 32, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 957 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 85 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 154, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 281 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 32, ग्रामीण क्षेत्रातील 79, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 42 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 827 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.05 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 579 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 783, सातारा जिल्ह्यात 125, सोलापूर जिल्ह्यात 235, सांगली जिल्ह्यात 83 तर कोल्हापूर जिल्ह्यात 353 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोनाबाधित 2 हजार 973 रुग्ण असून 1 हजार 603 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 270 आहे. कोरोनाबाधित एकूण 100रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 6 हजार 834 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 331 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 93 आहे. कोरोना बाधित एकूण 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 327 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 822 आहे. कोरोना बाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 3 हजार 680 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 179 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 410 आहे. कोरोना बाधित एकूण 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 1 हजार 387 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 95 हजार 178 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 6 हजार 209 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 13 हजार 956 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.
( टिप :- दि. 25 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )