पंढरपुरातील पोलीस वसाहातीचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार – गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचे आश्वासन
पंढरपूर – पंढरपूर येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वसाहतीच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात मुंबईत वरिष्ठ अधिकार्यांसोबत तातडीने बैठक घेवून हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवला जाईल, असे आश्वासन राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पोलीस वसाहाती संदर्भातील मागणीचे लेखी निवेदन गृहमंत्री देसाई यांना दिले. त्यावेळी देसाई यांनी हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
गृह राज्यमंत्री देसाई शनिवारी करमाळा तालुका दौर्यावर आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरपूर विभागातील विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांची संख्या आहे. येथे पोलीस कर्मचार्यांची जुनी वसाहात आहे. सध्या यातील घरे जीर्ण झाली आहेत. येथे नवीन वसाहात उभारण्या संदर्भात प्रस्ताव तयार करुन तो पाठवला आहे. परंतु तो अद्य़ाप लाल फितीमध्य़े अडकून पडला आहे.
पोलीस वसाहातीचा प्रश्न तातडीने सोडविण्या संदर्भात आज संभाजी शिंदे यांनी गृहमंत्री देसाई यांच्याशी चर्चा केली. या शिवाय भाळऴणी (ता.पंढरपूर) येथे पोलीस औट पोस्ट सुरु करण्याची ही मागणी केली आहे. याबाबत तातडीने माहिती घेवून यावरही कारवाई केली जाईल असेही मंत्री देसाई यांनी आश्वासन दिल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील,पंढरपूर शिवसेनेचे शहर प्रमुख रवी मुळे,युवा सेना शहर समन्वयक अमित गायकवाड,युवा सेना तालुका उपप्रमुख रणजित कदम आदी उपस्थित होते.