पंढरपूरमध्ये रात्री ७५ मिलीमीटर पावसाची नोंद
पंढरपूर – बुधवारी रात्री व गुरूवारी पहाटे पंढरपूर शहर व तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. पंढरपूरमध्ये याची नोंद ७५ मिलीमीटर इतकी आहे.
तालुक्यात या पावसाळा हंगामात जून व जुलै महिन्यात सरासरी ३२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही समाधानकारक स्थिती आहे. आजचा पाऊस पंढरपूरमध्ये मोठ्याप्रमाणात नोंदला गेला आहे. तालुक्यात याची नोंद सरासरी ३०.७७ मि.मी. आहे.
पंढरपुर तालुका आज दि. 30/7/2020 रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब 15 मिमी
पट कुरोली 31 मिमी
भंडीशेगाव 30 मिमी
भाळवणी 25 मिमी
कासेगाव 28 मिमी
पंढरपूर 75 मिमी
तुंगत 32 मिमी
चळे 24 मिमी
पुळुज 17 मिमी
एकूण पाऊस 277 मिमी
—————————————-
सरासरी पाऊस 30.77 मि. मी.
—————————————-
आज अखेर सरासरी पाऊस 323.22 मिलीमीटर
—————————————-